छत्तीसगड: दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. सुरक्षा दलांचा वरचष्मा पाहून नक्षलवाद्यांनी जंगलामध्ये पळ काढला

विजापूर - छत्तीसगड राज्यामधील विजापूर जिल्ह्यामधील घनदाट जंगलाच्या भागामध्ये झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षा दलांनी दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले.

येथील पदमेता नावाच्या गावाजवळ काल (रविवार) नक्षलविरोधी मोहिम राबवित असताना सुरक्षा दलांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. मात्र सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. सुरक्षा दलांचा वरचष्मा पाहून नक्षलवाद्यांनी जंगलामध्ये पळ काढला. यानंतर राबविण्यात आलेल्या शोधमोहिमेमध्ये दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले. बस्तर प्रदेशाचे पोलिस महानिरीक्षक एस आर पी कल्लुरी यांनी यासंदर्भातील महिती दिली.

Web Title: Two Naxals Killed In Gun-Battle In Chhattisgarh