अमृतसरमधून पाकिस्तानच्या दोन नौका जप्त

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 जानेवारी 2017

अमृतसर (पंजाब) : पंजाबमधील रवी नदीतील तोता गुरू पोस्ट येथून सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या दोन नौका जप्त केल्या आहेत.

नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने किनाऱ्यावर या दोन्ही नौका लावण्यात आल्याचे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना आढळून आले. दोन्ही नौका रिकाम्या होत्या. नौकेत अद्याप काहीही सापडलेले नाही. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेले नाही. गेल्या काही दिवसात घडलेली अशा प्रकारची ही चौथा घटना आहे. ऑक्‍टोबरमध्ये याच ठिकाणी पाकिस्तानची नौका जप्त करण्यात आली होती.

आगामी विधानसभा निवडणुकांमुळे पंजाबमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था आहे. या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानची नौका सापडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Two Pakistani boats seized at Punjab's Tota border out post by BSF