गाईच्या कत्तलप्रकरणी दोन पोलिस निलंबित 

पीटीआय
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

शाहजहानपूर (उत्तर प्रदेश) (पीटीआय) : गाईची कत्तल केल्याच्या आरोपावरून नेकपूर गावातील नागरिकांनी एकास बेदम चोप देऊन त्याचा छळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर निघोही पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांना बुधवारी निलंबित करण्यात आले आहे. 

ही घटना गेल्या आठवड्यात गुरुवारी (ता. 16) घडली. भुरा नावाची व्यक्ती गाईची कत्तल करीत असल्याचे पाहून संतप्त झालेल्या नेकपूरच्या ग्रामस्थांनी त्याला बेदम मारहाण केली. जमिनीवर पडलेले मांसाचे तुकडे तोंडाने उचलण्यास त्याला भाग पाडले, अशी माहिती पोलिस अधीक्षक एस. एस. चिनप्पा यांनी दिली. घटनास्थळी संबंधित पोलिस कर्मचारी उपस्थित होते. ते ग्रामस्थांना मदत करीत होते व या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण करीत होते. या घटनेची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. 

Web Title: Two policemen suspended for cow slaughter