वारंगळ तुरुंगातून दोन कैदी पळाले

वृत्तसंस्था
शनिवार, 12 नोव्हेंबर 2016

वारंगळ - कैद्यांना दिलेल्या बेडशीटचा वापर करून तेलंगणातील वारंगळ मध्यवर्ती तुरुंगातून दोन कैदी पळून गेल्याची घटना समोर आली आहे.

वारंगळ - कैद्यांना दिलेल्या बेडशीटचा वापर करून तेलंगणातील वारंगळ मध्यवर्ती तुरुंगातून दोन कैदी पळून गेल्याची घटना समोर आली आहे.

आज (शनिवार) पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान ही घटना घडली. त्यामध्ये उत्तर प्रदेशमधील सैनिक सिंह आणि बिहारमधील राजेश यादव या दोन कैद्यांचा समावेश आहे. या दोघेही तुरुंगात सश्रम कारावासाची शिक्षा भोगत होते. ते बेडशीटच्या साहाय्याने तुरुंगाच्या भिंतीवरून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांना 10 सप्टेंबर रोजी वारंगल येथील तुरुंगात हलविण्यात आले होते. तुरुंगाची मोठी भिंत ओलांडून कैदी पळून गेल्याबद्दल तुरुंगनिरीक्षक के. न्युटॉन यांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. तसेच तुरुंगात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचेही सांगितले आहे. फरार कैद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी मोहिम उघडण्यात आली आहे.

भोपाळ मध्यवर्ती तुरुंगातून अलिकडेच आठ जण दहशतवादी पळून गेले होते. त्यानंतर भोपाळपासून 10 किलोमीटर अंतरावर या आठही जणांना पोलिसांनी ठार केले होते. या पार्श्‍वभूमीवर कैदी पळून जाण्याची शक्‍यता कमी झाली होती. मात्र तरीही वारंगळ तुरुंगातून दोन कैदी फरार झाल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Two prisoners escape from Warangal jail