हैदराबादमध्ये दोन रेल्वेंच्या धडकेत १२ जखमी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

तेलंगणमधील काचीगुडा रेल्वेस्थानकाजवळ दोन रेल्वे गाड्यांची धडक होऊन १२ जण जखमी झाले. हुंद्री इंटरसिटी एक्‍स्प्रेस आणि लोकलची (मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट सिस्टीम रेल्वे- एमएमटीएस) सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास धडक झाली.

हैदराबाद - तेलंगणमधील काचीगुडा रेल्वेस्थानकाजवळ दोन रेल्वे गाड्यांची धडक होऊन १२ जण जखमी झाले. हुंद्री इंटरसिटी एक्‍स्प्रेस आणि लोकलची (मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट सिस्टीम रेल्वे- एमएमटीएस) सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास धडक झाली. 

कर्नूलहून येणारी हुंद्री इंटरसिटी एक्‍स्प्रेस फलाटावर उभी असतानाच त्याच ट्रॅकवर लोकल आल्याने हा अपघात झाला. लोकल येत असताना सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे सूचना मिळाली नाही, असे प्रथम सांगण्यात आले; पण या अपघाताला ‘एमएमटीएस’चे चालक जबाबदार असल्याचे समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two railway accident in hyderabad