सख्या बहिणींवर चार जणांचा सामूहिक बलात्कार

बलात्कार
बलात्कार

दोन सख्या बहिणींचं अपहरण करुन सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. दोन मित्रांनी दोन सख्या बहिणींचं अपहरण केलं. त्यानंतर चार जणांनी सख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. प्रतापनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्याचार झालेल्या एका मुलीचं वय 19 तर दुसरीचं 20 वर्ष असं वय आहे. दोन मित्रांनी एक जून रोजी दोन सख्या बहिणींचं अपहरण केलं.गेल्या काही दिवसांपासून त्या मुलीसोबत त्यांनी ओळख तयार केली होती. ओळख असल्यामुळे दोन्ही मुली त्यांच्यासोबत गेल्या, असं प्रतापनगर पोलिस स्टेशनमधील वरिष्ठ आधिकाऱ्यानं सांगितलं. फूस लावून मुलींना घेऊन जाणाऱ्या दोन्ही मुलांची ओळख पटली आहे. दोन्ही सख्या बहिणी प्रतापनगरमध्ये भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहतात. लहान बहिण खासगी कंपनीमध्ये कामाला आहे. तर मोठी बहिण घरीच असते.

पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, एक जून रोजी दोघी अपार्टमेंटच्या खाली फिरत होत्या. त्यावेळी दुचाकीवर चार जण आले. त्यामधील दोन जण ओळखीचे होते. या चारही जणांना धमकावून बहिणींना घरात घेऊन गेले. तेथे चार जणांनी सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर तरुणांनी दोघींना आपर्टमेंटच्या खाली सोडलं. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com