पत्नीला म्हणालो, मला मेहुणी आवडते मग काय...

वृत्तसंस्था
सोमवार, 9 डिसेंबर 2019

एक नवरा अन् दोन नवऱया असलेले छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भिंड जिल्ह्यातील मेहगांव जनपदमधील गुदावली गावात हा विवाह सोहळा पार पडला आहे.

भोपाळः एक नवरा अन् दोन नवऱया असलेले छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भिंड जिल्ह्यातील मेहगांव जनपदमधील गुदावली गावात हा विवाह सोहळा पार पडला आहे.

दिलीप आणि विनिता यांचा नऊ वर्षांपूर्वी विवाह झाला असून, दोघांना तीन मुले आहेत. दिलीप विनिताला म्हणाला मला तुझी बहिण आवडते. विनिताने मग दोघांचा विवाह लावून देण्याचे ठरवले. दोघांचा विवाह होत असताना दिलीपने विनिताच्याही गळ्यात पुन्हा हार घातला आणि एक नवरा आणि दोन नवऱया असा विवाह सोहळा पार पडला. विवाहाचे छायाचित्रही सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण, या विवाहामागचे कारण काही वेगळेच आहे. विनिता या सरपंच आहेत.

MP men took also married wife with sister in law | पती, पत्नी आणि मेहुणी..पत्नीच्या परवानगीनंतर एकाच मांडवात लग्न, पण का केलं असं? दिलीपने सांगितले की, 'पहिल्या पत्नीची तब्येत ठिक नाही. आम्हाला तीन लहान मुलं आहेत, त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी दुसरा विवाह करण्याचे ठरले. मेहुणी रचना आवडतच होती. घरामध्ये जेव्हा दुसऱ्या विवाहाचा विषय निघाला तेंव्हा विनिताला रचना आवडत असल्याचे सांगितले. मग, तिच्या परवानगी नंतर रचनासोबत दुसरा विवाह केला. पण, रचनासोबत विवाह करत असतानाच तिथेच विनिताही होती. मग, तिच्याही गळ्यात हार घातला.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two sisters marry same man at wedding ceremony