पाक सैन्याच्या गोळीबारात दोन जवान जखमी

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

पाकिस्तानी सैन्याने बुधवारी मध्यरात्री भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. पुँच जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. पाक सैन्याकडून मॉर्टर शेलिंगही टाकण्यात आले.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पुँच जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान जखमी झाले आहेत.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने बुधवारी मध्यरात्री भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. पुँच जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. पाक सैन्याकडून मॉर्टर शेलिंगही टाकण्यात आले. भारतीय जवानांनीही गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात भारताचे दोन जवान जखमी झाले असून, त्यांनी लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाकिस्तानी सैन्याने यापूर्वी शनिवारीही पुँच जिल्ह्यातील कर्नी भागातील चौक्यांवर गोळीबार केला होता. काश्मीर खोऱ्यात अशांशता पसरवण्यासाठी दहशतावद्यांच्या घुसखोरीसाठी पाक सैन्याकडून गोळीबार करण्यात येतो. लष्करे तैयबा, जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनांचे अनेक दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
राज ठाकरेंकडून बाळा नांदगावकरांच्या समर्थकांची उचलबांगडी
दोनशेच्या नोटांची छपाई सुरू
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी​
ठाणे: स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ​
कर्जमाफीसाठी निकषांची जंत्री; काही अटींमुळे अडसर शक्य​
सातारा: भाजप जिल्ह्याध्यक्षांच्या भावावर गोळीबार​
राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही तत्त्वाची लढाई : सोनिया गांधी

Web Title: Two soldiers injured in Pakistan firing on LoC