पाक गुप्तहेर असल्याच्या संशयावरून दोघांना अटक

वृत्तसंस्था
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

जैसलमर (राजस्थान) - पाकिस्तानचे गुप्तहेर असल्याच्या संशयावर पोलिसांनी आज दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले.

जैसलमर (राजस्थान) - पाकिस्तानचे गुप्तहेर असल्याच्या संशयावर पोलिसांनी आज दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले.

जैसलमर येथील धनाना येथून एकाला तर बिहारमधील भोजपूर येथून अन्य एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. अलिकडेच केंद्रीय अन्वेषण विभागाने सीमेवरील पोलिसांच्या मदतीने जैसलमर येथील सीमेवरून पाकिस्तानच्या एका गुप्तहेराला ताब्यात घेतले होते. या प्रकरणी तपास सुरू आहे. जैसलमर येथील एक स्थानिक नागरिकालाही राजस्थान पोलिसांनी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांना माहिती पुरवित असल्याच्या संशयावरून अलिकडेच ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यता आला असून या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे.

भारतीय लष्कराची माहिती आयएसआयला पुरविणाऱ्या एका टोळीला मध्य प्रदेश पोलिसांनी मागील आठवड्यात ताब्यात घेतले आहे. या टोळीत अकरा जणांचा समावेश आहे. ही टोळी चिनी बनावटीच्या वस्तू वापरून टेलिफोन एक्‍स्चेंज चालवित होती.

Web Title: Two suspected Pak spies detained by police