दोन तेलुगू अभिनेत्रींचे अपघाती निधन

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 एप्रिल 2019

तेलंगणमधील टीव्ही अभिनेत्री भार्गवी (वय 20) आणि अनुषा रेड्डी (वय 21) यांचे बुधवारी मोटार अपघातात निधन झाले.

हैदराबाद : तेलंगणमधील टीव्ही अभिनेत्री भार्गवी (वय 20) आणि अनुषा रेड्डी (वय 21) यांचे बुधवारी मोटार अपघातात निधन झाले.

एका मालिकेचे चित्रीकरण पूर्ण करून त्या हैदराबादला परत येत असताना आज सकाळी अप्पारेड्डी गुडा येथे ट्रकशी होणारी धडक चुकविताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार रस्त्याच्या कडेला झाडावर आदळली. यात भार्गवीचा जागीच मृत्यू झाला, तर रुग्णालयात दाखल करताना अनुषाचा मृत्यू झाला. चालक चक्री आणि मोटारीतील विनय कुमार हे अपघातात जखमी झाले.

भार्गवी व अनुषा दोघीही तेलंगणमधील होत्या. अनंतगिरी जंगलात चित्रीकरणासाठी त्या दोघी सोमवारी (ता. 15) विकाराबादला गेल्या होत्या.

Web Title: Two Telugu Actress Died in Road Accident