जम्मू-काश्‍मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना अटक!

वृत्तसंस्था
शनिवार, 22 ऑक्टोबर 2016

सांबा (जम्मू-काश्‍मीर) - जम्मू-काश्‍मीरमधून आज (शनिवार) जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी जिवंत सापडले असून शुक्रवारी पाकिस्तानचा एक गुप्तहेरही जिवंत सापडला आहे. तो भारतीय लष्करासंदर्भातील संवेदनशील माहिती पाकिस्तानमध्ये पोहचवित होता.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या दहशतवाद्यांचा शोध घेण्यात आला. त्यांच्याकडे पाकिस्तानमधील दोन सिम कार्डस्‌, दोन मोबाईल फोन्स आणि इतर काही कागदपत्रे सापडली आहेत, अशी माहिती सांबा चे पोलिस निरीक्षक जोगिंदरसिंह यांनी वृत्तंसस्थेशी बोलताना दिली. सफीर अहमद भट आणि फरहान फयाज या दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ते खालीद या सांकेतिक नावाने ओळखले जात होते. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या बारामुल्ला आणि परिसरात दहशतवादी कारवायांशी ते संबंधित होते. त्यांच्याकडून रायफल्स आणि काही शस्त्रास्त्रेही हस्तगत करण्यात आली आहेत. 16 ऑगस्ट रोजी लष्कराच्या एका सुरक्षा पथकावर झालेल्या हल्ल्यामध्ये त्यांचा सहभाग होता का याचा तपास करण्यात येत आहे. बारामुल्ला येथे या गुप्तहेरांना शोधण्यासाठी शुक्रवारपासून शोधमोहिम राबविण्यात आली होती. दरम्यान शुक्रवारी बोधराज नावाचा एक गुप्तहेर ताब्यात घेण्यात आला आहे. त्याच्याकडूनही सिमकार्डसह भारतीय सुरक्षा पथक तैनात असलेल्या ठिकाणाचा नकाशा ताब्यात घेण्यात आला आहे.

Web Title: two terrorist arreated in Jammu Kashmir