पुलवामा येथे चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

पुलवामा येथे चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

पुलवामा : जम्मू-काश्मिरच्या पुलवामा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज (शुक्रवार) चकमक झाली. या चकमकीत लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित दोन दहशतावाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. 

पुलवामा येथे झालेल्या चकमकीत इरफान अहमद व तसादक शाह या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील ही चकमक अवंतीपोरा येथील बंदीना भागात घडली.

याबाबत जम्मू-काश्मिरचे पोलिस महासंचालक दिलबाघ सिंह यांनी सांगितले, की काल रात्रीपासून अवंतीपुरा येथे विशेष मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. यातील दहशतवाद्यांचा संबंध स्थानिक दहशवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी आहे. इरफान अहमद आणि तसादक शाह या दोघांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com