काश्मीरमध्ये दोन दहशतवादी ठार; जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील बांदीपूर येथे दहशतवादी व जवानांमध्ये आज (शुक्रवार) जोरदार चकमक झाली. यामध्ये दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले तर एक जवान हुतात्मा झाला आहे, अधी माहिती अधिकाऱयांनी दिली.

अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, बांदीपुरा भागामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. जवानांनी आज सकाळी परिसर ताब्यात घेऊन दहशतवाद्यांविरोधात शोध मोहिम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना ठार केले. यामध्ये एक जवान जखमी झाला आहे.

दरम्यान, परिसरामध्ये अजून दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. यामुळे दहशतवाद्यांविरोधात अद्यापही शोध मोहिम सुरू आहे.

Web Title: Two terrorists killed, 1 awan martyred in ongoing encounter in jammu