कोक्राझार चकमकीत दोन दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
रविवार, 11 डिसेंबर 2016

कोक्राझार: आसामच्या कोक्राझार जिल्ह्यातील भुतान सीमेला लागून असणाऱ्या घनदाट जंगलामध्ये पोलिस आणि सुरक्षा दलांसमवेत झालेल्या चकमकीमध्ये दोन दहशतवादी ठार झाले. हे दोन्ही दहशतवादी "एनडीएफबी' (सॉंगबिजीत) या गटाचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या भागामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. त्यानंतर राज्य पोलिस आणि राजपूत रजिमेंटच्या सैनिकांनी ओकसाईगुडी परिसरातील कोचुगाव जंगलाच्या अंतर्गत भागामध्ये शोध मोहीम सुरू केली होती असे अतिरिक्त पोलिस महासंचालक एल. आर. बिष्णाई यांनी सांगितले. या चकमकीमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या ताब्यातून एके- 56 रायफल 21 जिवंत काडतुसे आणि पिस्तूल आणि सहा हजार रुपयांची रोकड, सायकली आणि रेशन कार्डही जप्त करण्यात आले आहे. दरम्यान अन्य फरार दहशतवाद्यांच्या शोधासाठीही मोहीम राबविली जात आहे.

आठ दहशतवाद्यांना अटक
राज्य पोलिस आणि आसाम रायफलच्या जवानांनी मिझोराम आणि म्यानमारच्या सीमेवर आठ दहशतवाद्यांना पकडले असून या दहशतवाद्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. अटक झालेल्या सर्व दहशतवाद्यांवर भारतीय पासपोर्ट आणि शस्त्र कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Two terrorists killed in Kokrajhar encounter