कुपवाडा येथील चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खातमा

वृत्तसंस्था
रविवार, 24 जून 2018

कुलगाममधील चाद्दर परिसरातून लष्कराचे गस्तीपथक रविवारी सकाळी जात होते. त्यादरम्यान दहशतवाद्यांनी या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर लष्करातील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. जवान आणि दहशतवाद्यांकडून दोन्ही बाजूंनी अंधाधुंद गोळीबार सुरू होता. यात दोन दहशतवाद्यांचा खातमा करण्यात लष्कराला यश आले.

जम्मू : जम्मू काश्मीरातील कुपवाडा येथील चाद्दर परिसरात भारतीय लष्करातील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खातमा केला. दहशतवाद्यांनी लष्कराच्या गस्तीपथकावर हल्ला केल्यानंतर या चकमकीस सुरवात झाली. 

कुलगाममधील चाद्दर परिसरातून लष्कराचे गस्तीपथक रविवारी सकाळी जात होते. त्यादरम्यान दहशतवाद्यांनी या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर लष्करातील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. जवान आणि दहशतवाद्यांकडून दोन्ही बाजूंनी अंधाधुंद गोळीबार सुरू होता. यात दोन दहशतवाद्यांचा खातमा करण्यात लष्कराला यश आले. आज झालेल्या या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खातमा करण्यात लष्करातील जवानांना यश आल्याचे जम्मू काश्मीरचे पोलिस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी सांगितले. या चकमकीनंतर कुलगाममधील इंटरनेट सुविधा खंडित करण्यात आली.  

दरम्यान, यापूर्वी अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी चकमक झाली होती. या चकमकीत भारतीय लष्कराने चार दहशतवाद्यांचा खातमा केला होता. त्यानंतर आता ही चकमक झाली. यामध्ये 2 दहशतवाद्यांचा खातमा करण्यात लष्कराला यश आले. 

Web Title: Two terrorists killed in Kupwara encounter