भारताच्या 'या' सर्वोच्च पदावरील महिला मंत्र्यांची स्त्री शक्ती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी स्त्री शक्तीचे उत्तम उदाहरण प्रस्थापित केल्याचे या छायाचित्रांकडे बघुन वाटेल. 

नवी दिल्ली - देशातील दोन कॅबिनेट मंत्र्यांची दोन छायाचित्रे नुकतीच समोर आली आहेत. हे दोन्ही छायाचित्रे बघुन भारतातील साम्यवादाचे चित्र स्पष्ट होते. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी स्त्री शक्तीचे उत्तम उदाहरण प्रस्थापित केल्याचे या छायाचित्रांकडे बघुन वाटेल. 

Nirmala Sitaraman

ही छायाचित्रे सध्या बिजींग (चीन) येथे झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑरगनायझेशन मिटींग मधील आहे. येथे भारत आणि चीन यांमधील परराष्ट्रमंत्री खाते आणि संरक्षणमंत्री खाते यात बैठक झाली. छायाचित्रात दिल्याप्रमाणे या बैठकीत स्वराज या एकमेव स्त्री आहे ज्या त्यांच्या पुरुष सहकारी आणि चीनचे परराष्ट्रमंत्री व शिष्टमंडळ समोर देशाचे प्रतिनिधित्त्व करत आहेत. तसेच, संरक्षणमंत्र्यांच्या बैठीकीतही सितारामन या देखील एकमेव स्त्री देशाचे प्रतिनिधित्त्व करत आहेत. या बैठीकीतील स्त्री शक्ती आणि प्रगतीचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करुन कौतुक केले आहे.
 

शांघाय कोऑपरेशन ऑरगनायझेशन (एससीओ) एक आंतरराष्ट्रीय गठबंधन आहे. ज्यात आठ सदस्यीय देशांचा समावेश आहे आणि यूरेशियातील तीन निरीक्षक आहेत. हा 26 एप्रिल 1996 ला शांघाय पाच म्हणून स्थापित झाले होते.  

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Two top women ministers of India two striking photos