दोन महिला हॉकीपटूंचा संशयास्पद मृत्यू; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

झारखंडमधील सिमडेगा जिल्ह्यात सुनंदिनी बागे (वय 23) आणि श्रद्घा सोरेंग (वय 18) या युवा आदिवासी हॉकीपटूंचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. 

रांची ः झारखंडमधील सिमडेगा जिल्ह्यात सुनंदिनी बागे (वय 23) आणि श्रद्घा सोरेंग (वय 18) या युवा आदिवासी हॉकीपटूंचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. 

सुनंदिनी आणि श्रद्धा शनिवारपासून (ता. 10) बेपत्ता होत्या. बिरू गावात झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्यांचे मृतदेह रविवारी (ता. 11) आढळले. या दोघींचा खून केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून "एफआयआर' दाखल करण्यात आली आहे. या युवा हॉकीपटूंच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेचे गूढ लवकरच उलगडण्यात येईल, असा विश्‍वास पोलिस अधीक्षक संजीव कुमार यांनी व्यक्त केला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two tribal women hockey players found hanging