Court News : दोन बायका फजिती ऐका! कोर्टाने केलं पतीचं वाटप, दोघींना मिळणार तीन-तीन दिवस, तर रविवारी...

Court Order
Court Orderesakal

ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे. इथे जमिनीची नव्हे तर नवऱ्याची विभागणी झाली आहे. हे विचित्र वाटेल, परंतु प्रकरणच असं आहे. ग्वाल्हेरच्या कौटुंबिक न्यायालयात पती तीन-तीन दिवस दोघींसोबत राहणार असा करार दोन पत्नी आणि पतीमध्ये झाला आहे. रविवारी पतीला सुट्टी असेल. म्हणजे त्याला जे वाटेल ते तो रविवारी करू शकणार आहे.

Court Order
DK Shivkumar : 'आम्ही सत्तेत आल्यावर...', कर्नाटक काँग्रेस अध्यक्षांचा थेट डीजीपींना इशारा

ग्वाल्हेरच्या कौटुंबिक न्यायालयात एक अनोखा खटला समोर आला होता. ज्यात या व्यक्तीने दोन विवाह केले होते. जेव्हा पहिल्या पत्नीला ही गोष्ट समजली तेव्हा तिने कौटुंबिक न्यायालयात खटला दाखल केला. कौटुंबिक न्यायालयाचे समुपदेशक हरीश दिवाण यांनी तिघांचे समुपदेशन करून वाद मिटवला. पतीने दोन्ही पत्नींना प्रत्येकी एक फ्लॅट दिला आहे. शिवाय पतीच्या ७५ हजार पगारापैकी अर्धा पगारही दोघींना दिला जाणार आहे.

पती हरयाणातील एका मल्टिनॅशनल कंपनीत इंजिनिअर आहे. २०१८ मध्ये त्याचं लग्न झालं होतं. ते ही बराच काळ एकत्र होते. 2018 मध्ये जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा त्याने आपल्या पत्नीला ग्वाल्हेरमधील आपल्या माहेरच्या घरी सोडले. तो हरयाणाला परतला आणि तिथल्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका महिलेशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. त्या व्यक्तीने तिच्याशी दुसरे लग्न केले. जेव्हा पहिल्या पत्नीला याची माहिती मिळाली, तेव्हा दोघांमध्ये वाद झाला आणि तिने ग्वाल्हेरच्या कौटुंबिक न्यायालयात तक्रार दाखल केली.

Court Order
Shivsena News: 'ह्याच माणसाने माझ्याकडे भाजपची तक्रार केली होती अन्...'; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

पतीने दुसरे लग्न केले आहे, त्यामुळे उदरनिर्वाहासाठी न्याय हवा, अशी तक्रार पहिल्या पत्नीने केली. प्रकरण कौटुंबिक न्यायालयाचे समुपदेशक हरीश दीवाण यांच्याकडे गेलं. दिवाण यांनी दोन्ही पत्नी आणि नवरा यांना फोन करून तडजोडीचा मार्ग शोधला. सहा महिन्यांच्या वाटाघाटींनंतर पती आठवड्यात एका पत्नीकडे तीन दिवस आणि दुसऱ्या पत्नीसोबत तीन दिवस राहणार असे ठरले. रविवारी तो पूर्णपणे मोकळा असेल. या वेळेत तो त्याला पाहिजे तिथे जाऊ शकतो. त्यानंतर पत्नी आणि पती दोघांनीही यावर सहमती दर्शवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com