बलात्कार करणाऱ्या दोन युवकांना अटक

वृत्तसंस्था
शनिवार, 21 एप्रिल 2018

कोसंबी (उत्तर प्रदेश): अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोन युवकांना शनिवारी अटक करण्यात आली. बबलू प्रजापती व भैया अशी त्यांची नावे आहेत.

सविता प्रजापती नावाच्या महिलेने गावातील एका अल्पवयीन मुलीला प्रलोभन दाखवून निर्जन स्थळी नेले. तेथे दोन युवकांच्या ताब्यात मुलीला तिने दिले. या युवकांनी संबंधित मुलीवर बलात्कार केला. ही घटना शुक्रवारी (ता. 20) घडली होती, अशी माहिती पोलिस अधीक्षक प्रतापकुमार गुप्ता यांनी आज दिली. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरुन "एफआयआर' दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two youth arrested for rape