त्यागींसह दोघांची जामीनासाठी याचिका

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलॅण्ड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर गैरव्यवहार प्रकरणातील सर्व पुरावे हे कागदोपत्री असून ते गुन्हे अन्वेषणने (सीबीआय) जप्त केले असल्याने मला जामीन मिळावा, अशी मागणी माजी हवाई दल प्रमुख एस. पी. त्यागी यांनी केली.

त्यागी यांच्या वकिलांनी विशेष सीबीआय न्यायाधीश अरविंद कुमार यांच्याकडे त्यागी यांच्यासह पुतण्या संजीव त्यागी व वकील गौतम खैतान यांच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतले. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 डिसेंबरला होणार असल्याची माहिती कुमार यांनी दिली आहे. या वेळी त्यागी यांच्या वकिलांनी ते न्यायालयाने सांगितलेल्या प्रत्येक तारखेला नियमितपणे हजर राहत असून सीबीआयच्या समन्सशिवायही ते तपासात सहकार्य करत असल्याने त्यांना जामीन द्यावा असे म्हटले. तसेच त्यागी यांना अटक होण्यापूर्वी त्यांची पत्नी, कन्या आणि सून आणि त्यांची आई यांचीही चौकशी झाली असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.

Web Title: tyagi demands bail