Udaipur Murder Case : NIA कडून आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत 7 जणांना जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Udaipur Murder Case

Udaipur Murder Case : NIA कडून आणखी एका आरोपीला अटक

Udaipur Murder Case: NIA ला उदयपूर हत्याकांडातील सातव्या आरोपीला अटक करण्यात यश मिळाले आहे. आरोपी फरहाद मोहम्मद शेख (31) याला काल अटक करण्यात आली. एनआयएने सांगितले की, अटक करण्यात आलेला व्यक्ती रियाझ अटारीचा जवळचा सहकारी होता, जो या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे आणि त्याने कन्हैया लालच्या हत्येच्या कटात सक्रिय सहभाग घेतला होता. या प्रकरणी यापूर्वी २९ जून, १ जुलै आणि ४ जुलै रोजी सहा आरोपींना अटक करण्यात आली होती.

एनआयएने पकडलेला हा आरोपी बबला म्हणून ओळखला जातो. कन्हैया लालच्या हत्येसाठी बाबलाने रियाझ आणि गौस मोहम्मदला रेकी करण्यात मदत केली होती. याशिवाय खुनाच्या कटातही त्याची महत्त्वाची भूमिका आहे. विशेष म्हणजे हत्येनंतर दुसऱ्याच दिवशी बाबला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते, मात्र नंतर त्याची सुटका करण्यात आली.

हेही वाचा: राज्यात मागील २४ तासांत पावसाचे ९ बळी, तर ४९१६ जणांचे स्थलांतर

उदयपूरमध्ये झाली होती कन्हैयालालची हत्या

28 जून रोजी उदयपूरमध्ये रियाझ अटारी आणि गौस मोहम्मद या दोन हल्लेखोरांनी कन्हैया लाल नावाच्या एका टेलरची फेसबुक पोस्टवरून हत्या केली होती. भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्माच्या समर्थनार्थ कन्हैया लालने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. कपडे शिवण्याच्या बहाण्याने आरोपी त्याच्या दुकानात आले आणि नंतर त्याची निर्घृण हत्या केली. हत्येदरम्यान आरोपीने व्हिडिओ देखील बनवला होता.

आरोपींनी हत्येचा व्हिडिओ व्हायरल केला. दोन्ही आरोपींना राजस्थान पोलिसांनी एकाच दिवशी अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. या हत्येप्रकरणी आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा: नव्या सरकारचं भवितव्य सोमवारी ठरणार! पण कोर्टाची सुनावणी लांबणीवर?

Web Title: Udaipur Murder Case Nia Arrested One More Accused In Udaipur Murder Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NIA
go to top