पवारसाहेबांना विचारा ते समाेरच हाेते; चुकीच्या गाेष्टींना मी थारा देत नाही

सिद्धार्थ लाटकर | Thursday, 23 July 2020

बाळासाहेब ठाकरे माेठे हाेते, आहेत. त्यांच्याबद्दल कायमच आदर आहे. पवार साहेबांबराेबर मी काम केले आहे. त्यांचा स्वभाव मला माहिती आहे. जर शिवरायांचा अपमान झाला असता तर त्यांनी मला आवाज उठवायला नक्कीच सांगतिले असते. उदयनराजे काेणत्याही चुकीच्या गाेष्टीला थारा देत नाही हे लक्षात ठेवा असेही त्यांनी नमूद केले. 

सातारा : राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी कोणाचाही अपमान केलेला नाही. अन् छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाला असत तर मी काय गप्प बसलाे असताे का ? तिथल्या तिथे राजीनामा दिला असता, पण तसं काही झालंच नाही. मी काय तुम्हांला गप्प बसणाऱ्यांपैकी वाटलाे का पण जे घडलेच नाही त्याला राजकारणासाठीचा अँगल देऊ नका असे आवाहन आणि शपथविधीनंतरच्या निर्माण झालेल्या वादाबाबत खासदार उदयनराजे भाेसले यांनी दिल्लीत एका वृत्त वाहिनीशी बाेलताना स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान यावेळी उदयनराजेंनी खासदार संजय राऊत हे महान व्यक्ती आहेत अशी टिप्प्णी करुन सेनेबराेबरच काॅंग्रेसवर निशाणा साधला.

राज्यसभेचा नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा बुधवारी (ता.22) झाला. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदारकीची शपथ घेतली आहे. राजीव सातव यांची खासदारकीची मराठीतून शपथ घेतली आहे. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करुनच हा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनात झाला. उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी असा जयघोष केला. त्यावर नायडू यांनी हे सभागृह नसून माझे दालन असल्याचे स्पष्ट करुन उदयनराजेंचे कान टाेचले. 

शपथविधीनंतर जय भवानी, जय शिवाजी घोषणा देणाऱ्या उदयनराजेंचे व्यंकय्या नायडूंनी टाेचले कान 

दरम्यान या प्रकाराचा शिवप्रेमींनी साेशल मिडियावर निषेध व्यक्त केला. त्यातून राज्यात राजकारण पेटलं. खासदार संजय राऊत यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्याकडून सांगली सातारा बंदची अदयाप घोषणा नाही असे ट्विट केले. दरम्यान आज (गुरुवार) दिल्लीत जे घडलेच नाही त्यावर काय बाेलायचे अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी देत छत्रपती शिवाजी महाराजा यांच्या नावाने भरपूर राजकारण झालं. महाराजांचा अपमान झाला असता, तर गप्प बसणारा मी नाही, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता, पण तसं काही झालंच नाही अहाे. सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला तो, फक्त जे राज्यघटनेत नाही त्याला घेतला, माझी हात जोडून राजकारण करणाऱ्यांना विनंती आहे आतापर्यंत अनेक गोष्टींवरुन राजकारण झालं, महाराजांचा अवमान झाला असता, तर मी गप्प बसलो नसतो, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता तर मी गप्प बसलो असतो का? तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे. अस देखील उदयनराजे म्हणाले आहेत

 

बाेलता बाेलता उदयनराजेंनी कॉंग्रेसच्या सदस्यांनी आक्षेप घेतल्याचे सांगून टाकले. ते म्हणाले संबंधित सदस्यांना व्यंकय्या नायडूंनी थांबवलं, पवारसाहेबांना विचारा काय झालं ते. साहेब समाेरच बसले हाेते. आता मला सांगा नायडूंची काय चूक. आक्षेप घेणारे काेण काॅंग्रेसचे. काेण हाेते ते मला माहिती नाही कारण सर्वांनीच मास्क घातले हाेते. बरं महाराष्ट्रात सरकार कोणाचे आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसचे आहे ना. जे घडले नाही ते भासविण्याचा प्रयत्न करु नये. ज्यांनी आक्षेप घेतला ते राज्य घटनेबाबतचा होता. मा त्या घराण्याचा घटक आहे. मी शांत बसेन का. मी कोणाची कधी बाजू घेत नाही. सर्व सदस्यांनी मास्क घातले होते. जे चुकीचे असेल त्याला मी थारा देत नाही.
 
संजय राऊत यांच्या वक्तव्याबद्दल उदयनराजे म्हणाले मी काही त्यांच्यावर उत्तर देणार नाही. त्यांना लाईमलाईटमध्ये राहण्याची सवय आहे. मी काही बोललो तर ते पुन्हा काही तरी बोलतात. शिवसेना हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर आहे. आम्ही त्या कुटुंबातील नाही म्हणणाऱ्यांनी मला खूप डिवचले. मला त्यांनी पत्रकार परिषद घेण्यास भाग पाडले. छत्रपती शिवाजी महाराज मोठे की बाळासाहेब ठाकरे ? असा उलट सवाल उदयनराजेंनी केला. शिवसेना भवनावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो खाली आणि बाळासाहेबांचा वर, का ? असा प्रश्‍न मी लॉजिक म्हणून विचारत आहे. हा प्रश्‍न तुम्ही म्हणजे जनतेने सेनेला विचारावा. मी या आधी पण म्हटले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव शिवसेनेने बाजूला काढावे आणि ठाकरे सेना ठेवावे.
 

दरम्यान बाळासाहेब ठाकरे माेठे हाेते, आहेत. त्यांच्याबद्दल कायमच आदर आहे. पवार साहेबांबराेबर मी काम केले आहे. त्यांचा स्वभाव मला माहिती आहे. जर शिवरायांचा अपमान झाला असता तर त्यांनी मला आवाज उठवायला नक्कीच सांगतिले असते. उदयनराजे काेणत्याही चुकीच्या गाेष्टीला थारा देत नाही हे लक्षात ठेवा असेही त्यांनी नमूद केले.

...तर तिथल्या तिथं राजीनामा दिला असता : उदयनराजे भोसले