esakal | वेश्या व्यवसाय प्रकरणी अटक तरुणी कोरोना पॉझिटिव्ह, 14 पोलिस कर्मचाऱ्यांना केलं क्वारंटाइन
sakal

बोलून बातमी शोधा

prostitue corona positive

सेक्स रॅकेटमध्ये सापडलेल्या तरुणीला जामिन मिळाल्यानंतर सोडून देण्यात आलं होतं. आता तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर शोध घेतला जात आहे.

वेश्या व्यवसाय प्रकरणी अटक तरुणी कोरोना पॉझिटिव्ह, 14 पोलिस कर्मचाऱ्यांना केलं क्वारंटाइन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उदयपूर - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारतात कोरोना बाधितांची संख्या सहा लाखांवर पोहोचली असली तरी कोरोना मुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे. दरम्यान, राजस्थानातील उदयपूर इथं तीन महिला डिएसपींनी दोन दिवसांपुर्वी पीटा अंतर्गत कारवाई केली होती. यामध्ये दहा तरुण आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या सात तरुणींना अटक केली होती. या कारवाईमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या एका तरुणीची कोरोना टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. या कारवाईवेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, एक जुलैच्या रात्री सुखेर ठाण्याच्या हद्दीत हॉटेल राम लखनवर छापा टाकण्यात आला होता. डीएसपी चेतना भाटी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्या चार तरुणींना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या तरुणींना पोलिस कस्टडीत ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची कोरोनाची टेस्टही केली. अटक केलेल्या तरुणींवर लक्ष ठेवण्यासाठी चार महिला कॉन्स्टेबल तैनात करण्यात आल्या होत्या. तर पोलिस ठाण्यातील टीमने कागदोपत्री कारवाई पूर्ण केली होती.

हे वाचा - पोलिसांनी विकास दुबे सोबत दोस्ती दाखवली नसती, तर आज 'वर्दी'चा रंग लाल झाला नसता

कोरोना टेस्टचा रिपोर्ट आल्यानंतर त्यामध्ये एका तरुणीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिस विभागाने सर्व कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जे हॉटेलवर छापा टाकण्यासाठी कारवाईवेळी हजर होते. पोलिस विभागाने त्या सर्व लोकांना क्वारंटाइन करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. एएसपी गोपाल स्वरुप मेवाडा यांनी सांगितलं की, डीएसपी चेतना भाटी यांच्या पथकाला क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आलं आहे. तर सुखेर आणि घंटाघर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचीही कोरोना टेस्ट करण्यात येत आहे. क्वारंटाइन करण्यात आलेल्यांमध्ये एक डीएसपी, दोन एसएचओ आणि 11 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

हे वाचा - ते पोलिस ओरडून सांगत होते, आम्हाला जीवे मारुन तुम्ही वाचणार नाही!

पोलिस कर्मचाऱ्यांची कोरोनाच्या दोन टेस्ट करण्यात येतील असं सांगण्यात येत आहे. दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर सर्व जण निश्चिंत होऊ शकतील. वेश्या व्यवसाय करणारी तरुणी दिल्लीत राहणारी असल्याचे सांगण्यात येत आहे. सेक्स रॅकेटमध्ये सापडलेल्या तरुणीला जामिन मिळाल्यानंतर सोडून देण्यात आलं होतं. आता तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर शोध घेतला जात आहे. तरुणी उदयपूरमधून बाहेर गेली असल्याचं समोर आलं आहे. आता तिच्या मोबाईल लोकेशनवरून शोध घेतला जात आहे. एवढंच नाही तर पोलिसांनी तरुणीला अटक करण्याआधी आणि जामिनावर सुटल्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या लोकांची ओळख पटवली जात असून सर्वांना आयसोलेट केलं जात आहे.