..आता मोदी परग्रहावर थापा मारायला जातील : उद्धव ठाकरे

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 जून 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परदेशातील दौरे संपल्यानंतर आता त्यांचे परग्रहावरचे दौरे सुरु होतील. देशात थापा मारून झाल्या. आता परग्रहावर थापा मारणार आहेत.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परदेशातील दौरे संपल्यानंतर आता त्यांचे परग्रहावरचे दौरे सुरु होतील. देशात थापा मारून झाल्या. आता परग्रहावर थापा मारायला जातील.

शिवसेनेच्या 52 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सभेत  उद्धव ठाकरे बोलत होते.

- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

- आता मोदींचे परग्रहावरचे दौरे सुरु होतील. 

-  देशात थापा मारून झाल्या. आता परग्रहावर थापा मारणार आहेत.

- मला जनतेसाठी भगवा फडकावणारा सैनिक हवा आहे. 

- गेलली सत्ता खेचून आणू पण हिंदुत्ववाद सोडणार नाही.

-  600 जवान हुतात्मा झाल्यानंतर भाजपला जाग

- राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच

- पाकिस्तानला आता चिरडून टाका तेव्हा आम्ही तुमचे अभिनंदन करू. 

- जम्मू-काश्मीरमध्ये शस्त्रसंधी राज्य सरकारने नाहीतर केंद्र सरकारने केली होती. 

- दहशतवाद्यांना धर्म नसतो, मग रमजानमध्ये शस्त्रसंधी का लागू केली ?

- देशाचे प्रश्न पहिले सोडवा.

- पगड्यांमुळे माणसे मोठी झाली नाहीत तर माणसांमुळे पगड्या मोठ्या झाल्या.

- मोदींनी थापा मारून सरकार आणले.

- विरोधकांनी आम्हाला राजकारण शिकवू नये.

- डोकी वापरून राजकारण करा.

- मुंबईचे महत्व कमी करण्याचा भाजपचा डाव.

- मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढण्यास उशीर का केला ?

- पगड्यांच्या राजकारणाने मराठी माणसात फूट नको.

- विदर्भ महाराष्ट्रातच राहणार.

- पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेणे हे मला अजून कळले नाही.

- आम्हाला विकास हवाय.

- नाणारमुळे कोकणाला दृष्ट लागेल.

- सत्तेत गेल्यानंतर आम्ही माजलेलो नाही. आपण सत्ता असो अगर नसो सरकारला नमवू शकतो. 

- राजकारण करायचे असेल तर डोक्याने करा पगडीवरून नको. पगडी घातली म्हणून विचार बदलत नाहीत.  

Web Title: uddhav thackeray Criticizes PM Narendra Modi