esakal | 'उद्धव ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

सत्तेच्या लालसेमुळे उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत हातमिळवणी करून रामभक्तांना धोका दिला. त्यांना अयोध्येत प्रवेशही करू देणार नाही आणि रामलल्लाचे दर्शनही करू देणार नाही. मी स्वतः उद्धव ठाकरेंना रस्त्यात रोखेल.

'उद्धव ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही'

sakal_logo
By
वृत्तसंस्था

अयोध्या : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सात मार्चला अयोध्या दौऱ्यावर जाणार असून, त्यापूर्वीच त्यांना विरोध सुरु झाला आहे. अयोध्येतील तपस्वी छावनीचे महंत परमहंस दास यांनी उद्धव ठाकरेंना अयोध्येत प्रवेश करू दिला जाणार नाही. त्यांना रस्त्यातच रोखू असा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त उद्धव ठाकरे अयोध्येला भेट देणार आहेत. ते रामलल्लाचे दर्शन घेणार असून, शरयूची आरतीही करणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला होता. यावरून आता परमहंस दास यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे.

परमहंस दास म्हणाले, की सत्तेच्या लालसेमुळे उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत हातमिळवणी करून रामभक्तांना धोका दिला. त्यांना अयोध्येत प्रवेशही करू देणार नाही आणि रामलल्लाचे दर्शनही करू देणार नाही. मी स्वतः उद्धव ठाकरेंना रस्त्यात रोखेल. उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा राजकीयदृष्ट्या असून, त्यांनी अयोध्याऐवजी मक्काला जावे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुस्तान हे हिंदू राष्ट्र बनविण्याचे स्वप्न होते. आता उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा अपमान केला आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांना अयोध्येत प्रवेश करू देणार नाही.

loading image