उज्ज्वला योजनेने आणखी कुटुंब होणार 'उज्ज्वल'

टीम ई-सकाळ
गुरुवार, 4 जुलै 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर देशातील लाखो महिलांसाठी 'उज्ज्वला योजना' आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) कार्डधारक महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात येत आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर देशातील लाखो महिलांसाठी 'उज्ज्वला योजना' आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) कार्डधारक महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात येत आहे.

'प्रधानमंत्री उज्ज्वला योजना' 1 मे 2016 रोजी उत्तर प्रदेशातील बलिया गावातून सुरवात करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून सरकारकडून 5 कोटी बीपीएल कुटुंबातील महिलांना एलपीजी गॅस कनेक्शन दिले जाण्याचे उद्दिष्ट्य निश्चित करण्यात आले. तसेच आता 2020 पर्यंत 8 कोटी एलपीजी कनेक्शन जोडण्याचे उद्दिष्ट्य आहे. यासाठी सरकारकडून घरगुती गॅस सिलिंडरसाठी प्रतिकनेक्शन 1600 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जात आहे.

दोन वर्षांत 4 कोटी महिलांना या उज्ज्वला योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यानंतर आता 8 कोटी हे लक्ष्य असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ujjawala scheme benefited to 2 Crores women