
UK Indian Origin Man: ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या व्यक्तीला 8 वर्षांची शिक्षा; जाणून घ्या काय आहे प्रकरण..
UK Indian origin man Jailed For Drugs: काही दिवसांपूर्वीच सिंगापूरमध्ये गांजाची तस्करी केल्याप्रकरणी एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला फाशी देण्यात आली होती. यानंतर आता भारतीय वंशाच्या व्यक्तीला अंमली पदार्थांची तस्करी आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ब्रिटनच्या कोर्टात आठ वर्षे 10 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
राज सिंग नावाचा 45 वर्षीय व्यक्ती दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये गुन्हेगारी संघटित करत होता. तो वकास इक्बाल नावाच्या व्यक्तीसोबत ड्रग्ज आणि शस्त्रे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होता.
राज सिंग आणि 41 वर्षीय वकास इक्बाल यांनी मनी लॉन्ड्रिंगचे पैसे आणि केटामाइन ड्रग्ज कॅनडाला पाठवण्याच प्लॉन करत होते. राज सिंह यांचे पूर्ण नाव राजिंदर सिंग बस्सी आहे. राजिंदर सिंग बस्सीला गिल्डफोर्ड क्राउन कोर्टात फेब्रुवारीमध्ये क्लास ए लेव्हल कोकेन आणि क्लास बी लेव्हल केटामाइनचा पुरवठा केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.
याशिवाय त्याच्यावर मनी लाँड्रिंग केल्याचा ही आरोप होता. एका प्रकरणातही त्याने प्राणघातक हल्ला केल्याची कबुली दिली. तसेच एकदा एका पबमध्ये त्याने भांडण केले होते. यात त्याने एका पोलीस अधिकाऱ्याला लाथ मारली होती. या प्रकरणात राज सिंह यांना 16 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
india today च्या वृत्तानुसार...