युक्रेनच्या 'डॉनबास'ला सुवर्णमयूर

युक्रेनच्या 'डॉनबास'ला सुवर्णमयूर

पणजी : हायब्रिड युद्धाची कहाणी सांगणाऱ्या युक्रेनच्या डॉनबास या चित्रपटाने भारताच्या 49 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्णमयूर पटकावला. 'वॉकिंग वुईथ द विंड' या प्रवीण मोर्चाले यांच्या चित्रपटाला आयसीएफटी युनेस्को गांधी मेमोरियल पारितोषिक प्राप्त झाले. 

ए. मा. याव या केरळमध्ये चित्रीकरण केलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक लिजो जुजे पेलिसरी यांना उत्कृष्ट दिग्दर्शन तर त्याच चित्रपटातील अभिनेते चेम्बान विनोद यांना उत्कृष्ट अभिनेत्याची बक्षिसे मिळाली. युक्रेनच्या 'व्हेन द ट्रिस फॉल' या चित्रपटातील अनास्तासिया पुस्तोवित यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचे बक्षीस प्राप्त झाले. मिल्को लाझारोवस यांच्या आगा या सिनेमाला विशेष ज्युरी पारितोषिकाने गौरविण्यात आले. रिस्पेक्‍टो या आल्बर्टो मॉंट्रियास यांच्या पदार्पणातील फिचर फिल्मला दिग्दर्शनाचे इनाम मिळाले. लॉस सायलेन्सियॉस या पोर्तुगीज, स्पॅनिश चित्रपटाच्या दिग्दर्शक बिट्रिज सिनर यांना आयसीएफटी युनेस्को गांधी मेमोरियल विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. 

इफ्फीच्या गोव्यातील सुविधांचा विस्तार करणार, दर्जा वाढवणार असल्याची घोषणा आज केंद्रीय माहिती व प्रसारण सचिव अमित खरे यांनी भारताच्या 49 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला निरोप देताना केली. इफ्फीला यंदा प्रतिनिधींचा लाभलेला मोठा प्रतिसाद पाहिला असता गोव्यात इफ्फीसाठी असलेल्या सुविधांचा विस्तार करणे अपरिहार्य बनले असून, येत्या वर्षभरात त्या होतील, असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.

इफ्फीला निरोप देण्यासाठी झालेल्या समारंभात राज्यपाल मृदुला सिन्हा, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, पंजाबचे राज्यपाल व्ही. पी. सिंग बडनोरे, नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई, अभिनेते अरबाज खान, अनिल कपूर, दिग्दर्शक, निर्माते राकेश ओमप्रकाश मेहरा, कबीर बेदी, राहुल रवैल, रकुल प्रीत, किर्ती सुरेश, चित्रांगदा सिंग, डायना पेंटी यांचा प्रामुख्याने समावेश होता. इफ्फीच्या ज्युरी मंडळातील सदस्यांचा गौरव यावेळी करण्यात आला. 

50 वर्षांचा इतिहास सुवर्णमहोत्सवी इफ्फीत 

इफ्फीचा सुवर्णमहोत्सव पुढील वर्षी साजरा होणार असून त्यासाठी तयारी आतापासून सुरू झाली असल्याची माहिती केंद्रीय माहिती सचिव अमित खरे यांनी दिली. इफ्फीचा 50 वर्षांच्या इतिहासाचा मागोवा सुवर्णमहोत्सवी वर्षांत घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com