युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थांचं जंतरमंतरवर आंदोलन; केली 'ही' मागणी

रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थांना मायदेशात परत आणण्यात आले होते.
Ukraine return Student
Ukraine return StudentSakal

नवी दिल्ली : रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थांना मायदेशात आणण्यात आलं होतं. वैद्यकीय क्षेत्रांमध्ये अभ्यास करणारे भारतीय विद्यार्थी आणि त्यांचे पालक दिल्लीतील जंतर मंतर मैदानात विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी सोयी उपलब्ध करुन द्याव्यात या मागण्यासाठी आंदोलन करत आहेत.

काही दिवसांपूर्वी युक्रेनमधील वादामुळे तेथील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना भारतीय सरकारने मिशन गंगा या योजनेच्या अंतर्गत मायदेशात आणले होते. या घटनेनंतर त्या विद्यार्थांचे शिक्षण अर्धवट सुटले होते. भारतातील तब्बल १२ हजार विद्यार्थांना या युद्धाचा फटका बसला आहे.

त्यानंतर आता परतलेल्या विद्यार्थांनी आणि त्यांच्या पालकांनी दिल्लीतील जंतर मंतर मैदानात आंदोलन सुरु केलं आहे. युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थांना अर्धवट राहिलेल्या शिक्षणाची सोय करु देण्यात यावी ही त्यांची प्रमुख मागणी असून हातात पोस्टर घेऊन विद्यार्थी आणि पालक दिसत आहेत.

Ukraine return Student
PM असताना भेट मिळालेल्या वस्तू Imran Khan यांनी दुबईत विकल्या? मोठा खुलासा

सरकारने विद्यार्थांच्या पुढील शिक्षणाची सोय करावी, त्यांना भारतातील विद्यापीठांमध्ये उर्वरित शिक्षण पूर्ण करण्यासाठी सोय करावी, त्यांचे करिअर वाचवावे आणि त्यांच्या यशस्वी आयुष्याला वाचवण्यासाठी मदत करायला पाहिजे अशी आशा पालकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातात मोदीवर विश्वास दाखवणारे पोस्टर दिसत आहेत. 'मोदी है तो मुमकीन है', युक्रेन रिटर्न बच्चे भारत के बच्चे, अशा आशयाचे पोस्टर हातात धरले आहेत. तसेच युक्रेनवरुन आलेले MBBS करणारे मुलं हे भारताचं भविष्य असेल, युक्रेनवरुन आलेल्या विद्यार्थांना मदत करा अशा मागण्या करणारे पोस्टर त्यांच्या हातात दिसत आहेत.

Ukraine return Student
Jobs: भारताबाहेर नोकरीच्या शोधात आहात? कुवैतमध्ये सुरु होतेय भरती

दरम्यान काही दिवसांपूर्वी झालेल्या रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय विद्यार्थी आणि नागरिक मायदेशी परतले होते. त्यानंतर तेथे शिक्षण घेत असलेल्या तब्बल १२ हजार भारतीय विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहिले होते. रशिया आणि युक्रेनमधील वाद अजूनही थांबला नसल्याने विद्यार्थांनी भारत सरकारकडे शिक्षणासाठी मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com