उमा भारतीच्या सुरक्षारक्षकाने केली आत्महत्या 

यूएनआय
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

भोपाळ (यूएनआय) : केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या खासगी सुरक्षारक्षकाने स्वत:च्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. राम मोहन दौनेरिया असे आत्महत्या केलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. काल रात्री त्याचे पत्नी सोबत भांडण झाले होते. भांडणानंतर दौनेरियाच्या पत्नीने पोलिसांना 100 क्रमांकावर दूरध्वनी केला होता. 

भांडण सोडविण्यात पोलिसांना अपयश आल्यानंतर ते त्यांना जवळच्याच पोलिस ठाण्यात नेले जात होते. त्याचदरम्यान दौनेरियाने स्वत:वर गोळी झाडून घेतली, असे पोलिस अधीक्षक सतीश समधीया यांनी सांगितले. ज्या वेळी दौनेरिया याला रुग्णालयात नेण्यात आले, त्या वेळी त्याला मृत घोषित करण्यात आले.त्यानंतर सत्र न्यायाधीश महेंद्र सिंह सोळंकी यांनी घटनेच्या न्यायालयीन चौकशीसाठी दौनेरियाच्या शवविच्छेदनाचे आदेश दिले. 

Web Title: Uma Bharti body guard committed suicide