आयोध्या, तिरंग्यासाठी कोणत्याही शिक्षेला तयार- उमा भारती

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

आयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यामागे कोणतेही कट-कारस्थान नव्हते. सर्वकाही खुल्लम-खुल्ला होते. मनात असे काहीही नव्हते.

नवी दिल्ली : आयोध्येसाठी, गंगा नदीसाठी आणि तिरंग्यासाठी मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे, असे केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी म्हटले आहे. 

उमा भारती म्हणाल्या, "मी आज रात्री आयोध्येला जाणार आहे. रामलला येथे जाऊन मला एवढा सन्मान दिल्याबद्दल मी प्रभू श्रीरामांकडे अभिमान आणि समाधान व्यक्त करेन.
आयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यामागे कोणतेही कट-कारस्थान नव्हते. सर्वकाही खुल्लम-खुल्ला होते. मनात असे काहीही नव्हते." 

आणीबाणी आणि 1984 च्या दंगलींमागे ज्या पक्षाचा हात होता त्यांना माझा राजीनामा मागण्याचा कोणताही अधिकार नाही, असे सांगत उमा भारती यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले. 
 

Web Title: uma bharti ready to face anything for ayodhya