Umesh Pal Murder Case : उमेश पाल हत्याकांडातील आरोपी अरबाज चकमकीत ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Umesh Pal Murder Case : उमेश पाल हत्याकांडातील आरोपी अरबाज चकमकीत ठार

Umesh Pal Murder Case : उमेश पाल हत्याकांडातील आरोपी अरबाज चकमकीत ठार

Umesh Pal Murder Case : प्रयागराजमध्ये शुक्रवारी उमेश पाल हत्याकांडीतील गुन्हेगार अरबाज पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला आहे, अशी माहिती प्रशांत कुमार, ADG ( कायदा-व्यवस्था), लखनऊ यांनी दिली आहे.

सोमवारी दुपारी धुमनगंज भागात अरबाजसोबत पोलिसांची चकमक झाली. यात अरबाज गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथे त्याच मृत्यू झाला.

उमेश पाल यांच्यावर हल्ला केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये अरबाजचा चेहरा दिसत होता. यानंतर घटनेवेळी वापरण्यात आलेली गाडी अरबाज वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

आरोपीसह अन्य दोघे प्रयागराजच्या धूमनगंज परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तेथे छापा टाकला असता. आरोपींची पोलिसांसोबत चकमक झाली. यात पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात अरबाजला छातीत आणि पायाला गोळ्या लागल्या.

गंभीर जखमी अवस्थेत अरबाजला उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले होते. परंतु, तेथे त्याचा मृत्यू झाला.