
Umesh Pal Murder : 'कहा था ना मिट्टी में…'; विजय उर्फ उस्मानच्या एन्काउंटरनंतर भाजप आमदाराचं ट्वीट चर्चेत
उमेश पाल हत्याकांडात सहभाग असलेल्या दुसऱ्या एका शूटरचे आज पोलिसांनी एनकाऊंटर केलं आहे. उमेश पाल यांच्यावर यानेच पहिली गोळी झाडली होती. त्यानंतर पोलिसांकडून या आरोपीचा कसून शोध घेतला जात होता.
दरम्यान आज सोमवारी सकाळी झालेल्या या एन्काउंटरमध्ये विजय कुमार उर्फ उस्मान चौधरी याच्या छातीत दोन गोळ्या लागल्या आहेत. तसेच या एन्काउंटर दरम्यान एक हवालदार जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार प्रयागराजच्या कौंधियारा भागात हे एन्काउंटर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान उस्मान चौधरीला गोळी लागली. जखमी अवस्थेत त्याला एसआरएन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र, तेथे त्याचा मृत्यू झाला.
उमेश पाल यांची उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात २४ फेब्रुवारी रोजी भरदिवसा हत्या करण्यात आली होती. उमेश पाल हा राजुपाल हत्याकांडातील साक्षीदार होता.
गोळी झाडणारा विजय उर्फ उस्मानच्या एन्काउंटरनंतर उत्तर प्रदेशचे भाजप आमदार शलभ मणि त्रिपाठी यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे. त्यांनी आज पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारेकरी उस्मानला गोळ्या घालून ठार केल्याची माहिती दिली आहे.
त्यांनी या ट्वीटमध्ये लिहीलंय की "काहा था ना कि मिट्टी में मिला देंगे.. । उमेश पाल और संदीप निषाद पर पहली गोली चलाने वाला हत्यारा उस्मान भी आज पुलिस मुठभेड़ में ढेर।"
गोरखुपुरचे खासदार रवि किशन यांनी देखील असंच ट्वीट केलं आहे, पूज्य महाराज योगी आदित्यनाथ यांनी देखील सांगितलं होतं की त्याला संपवू, उमेश पाल आणि संदीप निषाद यांच्यावर पहिली गोळी झाडणारा खूंखार फरार खूनी उस्मान देखील युपी पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरमध्ये ठार झाला असं म्हटलं आहे.