Umesh Pal Case : आरोपी शाइस्ता, गुड्डू मुस्लीम विरोधात लुकआऊट नोटीस जारी; मुंबईत लपल्याची शंका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lookout Notice

Umesh Pal Case : आरोपी शाइस्ता, गुड्डू मुस्लीम विरोधात लुकआऊट नोटीस जारी; मुंबईत लपल्याची शंका

उमेश पाल यांच्यासहित दोन सरकारी कर्मचाऱ्यांच्या हत्येच्या प्रकरणात आरोपी असलेल्या अतीकची पत्नी शाइस्ता परवीन, शूटर साबिर आणि बमबाज गुड्डू मुस्लीम यांच्याविरोधात लुकआऊट नोटिस जारी करण्यात आली आहे. ते विदेशात पळून जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून प्रत्येक विमानतळावरील सुरक्षा कठोर करण्यात आली आहे.

दरम्यान, उमेश पाल आणि त्यांच्या दोन सुरक्षारक्षकांची धूमनगंज येथील जयंतीपूर सुलेम सराय येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी अतीकची पत्नी शाइस्ता हिच्यासहित अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अतीकचा मुलगा असद यांच्यासहित फरार असलेल्या शूटरवर प्रत्येकी पाच लाखांचा इनाम जाहीर करण्यात आला आहे.

असद, शूटर गुलाम, अरबाज आणि उस्मान चौधरी हे पोलीस आणि एसटीएफ यांच्यातील चकमकीत ठार झाले आहेत. बॉम्बर गुड्डू मुस्लिम आणि साबीर यांचा शोध अद्याप लागलेला नसून शाईस्ताही फरार आहे. हे सर्वजण परदेशात पळून गेल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शाईस्ता मुंबईत असल्याची माहिती मिळत आहे. या आधारावर शाइस्ता आणि साबीर, गुड्डू यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. कोणताही आरोपी देश सोडून पळून जाऊ नये म्हणून गुप्तचर यंत्रणेचा अहवाल आल्यानंतर पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

अरमानने शरणागती पत्करली

या प्रकरणातील आरोपी असलेला आणि पाच लाखांचे बक्षीस असलेला नेमबाज अरमानने बिहारमधील सासाराम न्यायालयात आत्मसमर्पण केले आहे. हत्याकांडानंतर अरमान सासाराम येथील त्याच्या घरी पळून गेला होता. यानंतर तो न्यायालयात शरण आला आहे.

टॅग्स :policecrimeUP