Umesh Pal Murder : एक-दोन दिवसांमध्ये अतिकच्या मुलाची हत्या होणार; रामगोपाल यादवांच्या विधानाने खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ramgopal yadav statement

Umesh Pal Murder : एक-दोन दिवसांमध्ये अतिकच्या मुलाची हत्या होणार; रामगोपाल यादवांच्या विधानाने खळबळ

Uttar Pradesh News : समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांच्या विधानाने राज्यासह देशभरात खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रामगोपाल यांनी एक शंका उत्पन्न केली असून माफिया अतिक अहमदच्या एका मुलाची हत्या पुढच्या एक-दोन दिवसांमध्ये होऊ शकते, असं म्हटलं आहे.

उमेश पाल हत्याकांडानंतर पोलिस अॅक्शन मोडमध्ये आलेले आहेत. सोमवारी पोलिसांनी चकमकीत दुसऱ्या शूटरला मारलं. इतर फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिस गतीने तपास करीत आहेत. अतिकचा मुलगा असद याच्यासह पाच मोस्ट वाँटेड आरोपी फरार आहेत.

हेही वाचाः परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

यादरम्यान समाजवादी पक्षाचे महासचिव रामगोपाल यादव यांनी मोठं विधान केलं आहे. रामगोपाल यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे. न्यूज एजन्सी एएनआयच्या माहितीनुसार सपा महासचिव राम गोपाल यादव यांनी सांगितलं की, पोलिसांना खरे आरोपी सापडत नाहीत, त्यांच्यावर वरुन दबाव आहे. ते जो सापडेल त्याला मारतील. अतिक अहमदचे दोन मुलं आहेत. त्यापैकी एकाला एक-दोन दिवसांमध्ये मारलं जाईल.

रामगोपाल यादव यांनी सांगितलं की, माफियाच्या दोन मुलांना पहिल्या दिवशी पकडून नेण्यात आलेलं होतं. त्यातल्या एकाची हत्या होणार, तुम्ही लिहून घ्या.

त्यांच्या या विधानाने खळबळ उडाली असून उमेश पाल हत्याकांडामध्ये आणखी काय काय घडामोडी घडतात, याकडे देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

टॅग्स :Uttar PradeshCrime News