Umesh Pal Murder Case : गुंडाच्या पत्नीबाबत इनामाची घोषणा वादात

बसप आमदार उमाशंकर यांची उत्तर प्रदेश पोलिसांवर टीका
Umesh pal murder Controversy announces reward politics
Umesh pal murder Controversy announces reward politicssakal

बलिया : उमेश पाल हत्या प्रकरणी गुन्हेगार तसेच राजकारणी अतिक अहमद याची पत्नी शाईस्ता परवीन यांच्याबद्दल माहितीसाठी रोख बक्षीस जाहीर करण्याच्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या घोषणेवर बहुजन समाज पक्षाचे (बसप) वरिष्ठ नेते उमाशंकर सिंह यांनी टीका केली. हत्या प्रकरणाची उकल करण्यात अपयश आल्याने जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला.

परवीन सध्या फरार आहेत. त्यांना अटक होईल अशी माहिती देणाऱ्यास २५ हजार रुपयांचे इनाम पोलिसांनी जाहीर केले आहे. याबाबत उमाशंकर म्हणाले की, घटनेला १५ दिवस उलटून गेले तरी प्रयागराज पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही. हल्लेखोरांबद्दल माहितीसाठी अडीच लाख रुपयांचे इनामही जाहीर करण्यात आले आहे, पण अद्याप कुणालाही पकडता आलेले नाही.

Umesh pal murder Controversy announces reward politics
Jalgaon Crime News : मुलासह आईवडिलांकडून लग्नाचे वचन अन विद्यार्थिनीवर सलग....गुन्हा दाखल

परवीन यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल असे बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

अखिलेश यांचाही संदर्भ

एका गुन्हेगाराबरोबरील छायाचित्रावरून परवीन यांना अटक करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. याबद्दल सवाल उपस्थित करताना उमाशंकर यांनी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांचा संदर्भ दिला.

Umesh pal murder Controversy announces reward politics
Nashik Crime News : गावठी कट्टा विक्री करणाऱ्या तिघांना बेड्या

अखिलेश यांचे अलीकडेच एका गुन्हेगाराबरोबरील छायाचित्र प्रसिद्ध झाले. यानंतरही ते मुक्तपणे फिरत आहेत. अशावेळी पोलिसांनी त्यांना अद्याप अटक का केलेली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

भाजपवर टीका

उमाशंकर हे रसडाचे आमदार आहेत. त्यांनी परवीन यांना पाठिंबा दर्शविताना भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, परवीन यांचा या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही. पोलिसांना सुद्धा त्याबाबत काहीही सिद्ध करता आलेले नाही. त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. प्रयागराजच्या महापौरपदी त्यांची निवड जवळपास निश्चित आहे. भाजपला ही जागा गमवावी लागणार आहे. त्यामुळेच भाजपचा संताप झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com