'यूएन' आणि "एससीओ'ने व्यापक सहकार्य करावे; भारताची भूमिका 

पीटीआय
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

न्यूयॉर्क : दहशतवादी संघटना आणि त्यांचे जगभरातील जाळे उद्‌ध्वस्त करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघ आणि शांघाय सहकार्य परिषदेने (एससीओ) व्यापक सहकार्य करावे, अशी मागणी भारताने आज राष्ट्रसंघात केली. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांविरोधातही कठोर कारवाई केली जावी, अशी भूमिका भारताने मांडली. 

राष्ट्रसंघातील भारताचे प्रतिनिधी तन्मय लाल यांनी आज "यूएन' आणि "एससीओ' यांच्या सहकार्याबाबत चर्चा करण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीत भारताची भूमिका विशद केली. "दहशतवादी संघटना आणि त्यांचे जाळे नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायांनी एकत्रित प्रयत्न आणि सहकार्य करणे आवश्‍यक आहे. त्याचप्रमाणे दहशतवाद्यांना आश्रय आणि पाठबळ देणाऱ्यांना ओळखून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. त्यामुळेच यूएन आणि एससीओ यांच्यातील सहकार्य वाढण्याबाबत भारत अत्यंत आशावादी आहे.

प्रादेशिक सुरक्षेला बळकटी, आर्थिक सहकार्य, सांस्कृतिक संबंध दृढ करणे अशा काही क्षेत्रांमध्ये हे सहकार्य वाढू शकते,' असे लाल यांनी बैठकीत सांगितले. भारत जून 2017 मध्ये "एससीओ'चा पूर्णवेळ सदस्य बनला आहे. 

भारताने मांडलेले इतर मुद्दे 

- जगभरात संघर्षाचे वातावरण असल्याने सीमेवरील सुरक्षेवर परिणाम 
- तणाव कमी करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने शांततेचा आग्रह आवश्‍यक 
- जगासमोरील प्रश्‍न सोडविणे हाच यूएन, एससीओ सारख्या संस्थांचा उद्देश 
- भारत दोन्ही संस्थांचा सदस्य असून सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध 

Web Title: UN and SCO have made extensive cooperation