पाकिस्तानचा दावा संयुक्त राष्ट्रानेही फेटाळला

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 मे 2017

पाकिस्तानी सैन्याच्या सोबतीने यूएनचे अधिकारी एलओसीवर गेले होते. त्यांनी गोळीबाराचा आवाज ऐकला. पण, आमचे अधिकारी या गोळीबारात जखमी झालेले नाहीत.

नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) वाहनांवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) भारतीय लष्कराने हल्ला केल्याचा पाकिस्तानने केलेला दावा यूएनकडून फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली आहे.

पाकिस्तानकडून सतत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नाचक्की करण्याच्या प्रयत्नात असते. याच प्रयत्नातून त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे दोन अधिकारी भारतीय जवानांच्या हल्ल्यात जखमी झाल्याचा दावा केला होता. या अधिकाऱ्यांच्या एलओसी दौऱ्यावेळी भारतीय जवानांनी बुधवारी गोळीबार केल्याचे पाकिस्तानने म्हटले होते.

यावर बोलताना यूएनचे महासचिव एन्टानिओ गुतेरस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारीक यांनी म्हटले आहे, की पाकिस्तानी सैन्याच्या सोबतीने यूएनचे अधिकारी एलओसीवर गेले होते. त्यांनी गोळीबाराचा आवाज ऐकला. पण, आमचे अधिकारी या गोळीबारात जखमी झालेले नाहीत.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या ः
शिरुर: विनयभंग प्रकरणी महाराजाला मंदिरातून अटक​
तेजस एक्स्प्रेसमधून हेडफोन चोरीला, एलईडी स्क्रीनवर स्क्रॅच
पुणे अन् कोल्हापुरमधील अपघातग्रस्त बसचा क्रमांक एकच​
सहारनपूरमध्ये मोबाईल इंटरनेटवर बंदी​
काश्मीरमध्ये निर्णय घेण्यासाठी लष्कराचे हात मोकळे: जेटली
शेतकऱ्यांना फसवणाऱ्या टोळक्यात मीही सामील झालो: राजू शेट्टी

राज्यातील पाच स्थळांना मिळणार जैवविविधता वारसाचा दर्जा
मराठा क्रांती मोर्चा 9 ऑगस्टला मुंबईत धडकणार
समुद्रकिनाऱ्यांवर उद्यापासून बोटिंग बंद
मुंबई : हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत

Web Title: UN denies Pakistan's claim that India fired at a UN vehicle along LoC