'मोदीजी, उपचाराचा खर्च करा किंवा इच्छामरणाची परवानगी द्या'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

आग्रा : रक्तक्षयाने त्रस्त असलेल्या आपल्या मुलाच्या उपचाराचा खर्च करावा किंवा त्याला इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे पत्र एका पित्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे.

आग्रा : रक्तक्षयाने त्रस्त असलेल्या आपल्या मुलाच्या उपचाराचा खर्च करावा किंवा त्याला इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे पत्र एका पित्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे.

आग्रा येथील विपीन नावाच्या तरुण रक्तक्षयाच्या आजाराने त्रस्त आहे. याबाबत वृत्तसंस्थेशी बोलताना तो म्हणाला, "मला बरे व्हायचे आहे. मात्र माझे कुटुंब यापुढे माझ्या उपचारासाठीचा खर्च करू शकत नाहीत. त्यामुळेच एक शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही सरकारला पत्र पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना पत्र लिहून कळविले आहे.' विपीनच्या वडिलांनी पंतप्रधान, राष्ट्रपती आणि यादव यांना पत्र लिहिले आहे. 'विपीनवरील उपचाराचा खर्च करावा आणि जर खर्च करणे शक्‍य नसेल तर त्याला इच्छामरणाची परवानगी द्यावी. आम्ही त्यांच्या उपचारावर आणखी खर्च करू शकत नाहीत', अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.

उपचारादरम्यान कायमस्वरुपी निश्‍चल अवस्थेत असलेल्या रुग्णाला केवळ जिवंत ठेवण्यासाठी आवश्‍यक ठरणारे लाइफ सपोर्ट  काढून टाकता येतील, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 2011 साली दिला आहे. मात्र, गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णाबाबत कायद्यामध्ये नेमकी स्पष्टता नाही. मागील वर्षी केंद्र सरकारने या बाबत नागरिकांकडून सूचना आणि मते मागविली होती.

Web Title: Unable to bear expenses for son’s treatment, man writes to PM Modi, President to ‘sanction’ euthanasia