बेहिशेबी पैसा आढळल्यास सात वर्षे शिक्षा

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली  : नोटाबंदी झाल्यानंतर दुसऱ्याचा काळा पैसा स्वत:च्या बॅंक खात्यात ठेवणे महागात पडणार आहे. काळा पैसाधारक आणि तो पैसा बॅंक खात्यात ठेवणारा अशा दोघांवर बेनामी मालमत्ता कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. यात दोषींना सात वर्षांपर्यंत सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते.

प्राप्तिकर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाने देशभरात टाकलेल्या छाप्यांत बंद केलेल्या जुन्या नोटांचे दोनशे कोटी रुपयांचे बेहिशेबी व्यवहार समोर आले आहेत; तसेच 8 नोव्हेंबरपासून 50 कोटी रुपये जप्त केले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बॅंक खात्यात जमा होणाऱ्या मोठा रकमेवर प्राप्तिकर विभागाची नजर आहे. अशा प्रकारे जुन्या नोटांचा बेहिशेबी मोठा भरणा आढळल्यास बेनामी मालमत्ता कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. स्थावर व जंगम अशा दोन्ही मालमत्तांना हा कायदा लागू असून, याची अंमलबजावणी 1 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे.

या कायद्यांतर्गत बेहिशेबी पैसे असणारा आणि दुसऱ्याचे पैसे स्वत:च्या खात्यात ठेवणाऱ्या यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. त्यांना सात वर्षांपर्यंत सक्तमजुरीसह दंडाची शिक्षा होऊ शकते. याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने नोटिसा बजावण्यास सुरवात केली आहे. सध्या बॅंक खात्यातील अडीच लाखांवरील जमेवर प्राप्तिकर विभाग लक्ष ठेवून आहे. यापेक्षा कमी प्रमाणात बेहिशेबी रकमेचा भरणा आढळल्यासही कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: unaccounted money will put in jail for 7 years