मुरगाव - यांत्रिकी होड्यांद्वारे अनधिकृत मश्चिमारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

मुरगाव - 61 दिवसांच्या मासेमारी बंदीच्या काळात  यांत्रिकी होड्यांद्वारे मश्चिमारी केली जात आहे. त्या विरोधात सरकारने कडक कारवाई न केल्यास ट्रॉलर मालकही बंदी आदेश धुडकावून मासेमारी करणार असल्याचा इशारा गोवा ट्रॉलर मालक संघटनेने राज्याचे मत्स्यद्योग मंत्री विनोद पालयेकर यांच्याशी बोलताना दिला.

पालयेकर यांनी वास्कोतील ट्रॉलर मालकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच खारेवाडा येथील मश्चिमारी जेटीची पाहणी करण्यासाठी भेट दिली होती. तेव्हा बंदी काळातही यांत्रिकी होड्याद्वारे मासेमारी केली जात असुन, त्या विरोधात मश्चिमारी खाते काहीच करीत नाही अशी तक्रार ट्रॉलर मालकांनी केली.

सरकारने 1 जून पासून 61 दिवस मासेमारी बंदीचा आदेश जारी केलेला आहे. पण हा आदेश धुडकावून यांत्रिकी होड्याद्वारे बिनधास्तपणे मासेमारी केली जात आहे. त्यामुळे ट्रॉलर मालक संतापले आहेत. त्यांनी आपला राग मंत्र्यांसमोर उघड केला.

दरम्यान, मश्चिमारी खात्याकडे आवश्यक साधन सुविधा आणि मनुष्यबळ नसल्याने बेकायदेशीरपणे करण्यात येत असलेल्या मासेमारी विरोधात धडक कारवाई करणे अशक्य होत आहे. असे पालयेकर यांनी सांगितले. परंतु, यंदापासून कडक धोरण अवलंबिले जाईल असे ठणकावून सांगितले.

खारेवाडा येथील मश्चिमारी जेटीची वाताहत झाली आहे. अद्याप सुसज्ज जेटीची उभारणी होत नाही. याची दखल घेऊन विद्यमान जेटी विस्तारित करावी अशी मागणी यावेळी ट्रॉलर मालकांनी केली. तेंव्हा उपस्थित असलेले एमपीटीचे उपाध्यक्ष श्री राय यांनी विस्तारीकरणासाठी सी आर झेडची परवानगी आवश्यक असल्याचे मंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले. दरवर्षी एमपीटी कडून जेटीच्या देखभालीवर 5 ते 6 लाख रुपये खर्च केले जाते असेही श्री राय यांनी स्पष्ट करून सांगितले.

Web Title: Unauthorized Fishing by mechanical ships