देशात अघोषित आणीबाणी ; डाव्यांचा हल्लाबोल

यूएनआय
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

पाटना : देशाच्या विविध भागातून मानवाधिकार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्‍सवादी-लेनीनवादी) या पक्षाने नरेंद्र मोदी सरकारने देशात अघोषित आणीबाणी लादली असल्याचा आरोप केला. सर्व कार्यकर्त्यांची तातडीने सुटका करण्यात यावी, अशी मागणीही पक्षाचे सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य यांनी केली. 

1975च्या आणीबाणीत तसेच 1984च्या शीखविरोधी दंगलीतील विरोधकांवर मोदी सरकार निराशेतून कारवाई करत असल्याचे भट्टाचार्य यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. भाजप 2002मधील गुजरात दंगल तसेच अलीकडच्या काळातील मॉब लिंचिंगच्या घटना साजरा करत आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

चिदंबरम यांच्याकडून निषेध 

कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनीही मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या अटकेचा निषेध व्यक्त करताना डावा किंवा उजवा दृष्टिकोन अवलंबणे हे एखाद्याचे स्वातंत्र्य आहे आणि हाच स्वातंत्र्याचा मूलमंत्र होता, असे ट्विटरवर म्हटले आहे. आपल्या विचारधारेच्या पाठिंब्यावर हिंसाचारात सहभागी असणे किंवा चिथावणी देणे अशा घटनांमध्येच कट्टरपंथीयाला शिक्षा देणे योग्य ठरते. वकील आणि कवी यांचा समावेश असलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या अटकेचा मी निषेध करतो, असेही त्यांनी नमूद केले. 

सध्याच्या राजवटीत मानवाधिकार भंगाच्या विरोधात बोलणाऱ्या; तसेच दलित आणि आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्यांनाच लक्ष्य केले जात आहे. माझा मोबाईल, लॅपटॉप आणि पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आला आहे. मला वाटते, की ते या माहितीचा गैरवापर करतील. माझ्या जीमेल आणि ट्‌विटरचा पासवर्डही घेण्यात आला आहे. 

- सुधा भारद्वाज, मानवाधिकार कार्यकर्त्या आणि वकील 

भारताच्या विरोधातील लोकांना राहुल गांधी सहानुभूती दाखवत आहेत. या देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यरत नसावा असे वाटणाऱ्या लोकांचे ते नेते आहेत. सर्व नक्षलवादी आणि अन्य लोक कार्यरत असावेत, असे त्यांना वाटते. 
- राम माधव, भाजपचे सरचिटणीस 

Web Title: Undeclared emergency in the country