भारत-पाक सीमेवर पुन्हा भुयार सापडले

जम्मू-काश्‍मीरमधील सांबा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेलगत (आयबी) एक भुयार आढळले
Underground tunnel found again Jammu and Kashmir Samba district Indo-Pak border
Underground tunnel found again Jammu and Kashmir Samba district Indo-Pak bordersakal

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील सांबा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेलगत (आयबी) एक भुयार आढळले आहे. भारतीय हद्दीत घुसण्यासाठी जैशे-महंमद या दहशतवादी संघटनेच्या दोन आत्मघाती हल्लेखोरांकडून या सुरुंगाचा वापर करण्यात आला असावा, असा संशय असल्याचे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. आगामी अमरनाथ यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर हे सुरुंग आढळल्याने राज्यातील सुरक्षा व्यवस्था अधिक दक्ष झाली आहे.

जम्मूतील संजवान भागात २२ एप्रिल रोजी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी सुरक्षा पथकाने दोन आत्मघाती हल्लेखोरांना ठार केले होते. तेव्हापासून सीमा सुरक्षा दलाकडून (बीएसएफ) भुयाराचा शोध घेण्यात येत होता. अखेर काल सायंकाळी सांबा जिल्ह्यात एक भुयार शोधण्यात यश मिळाले, अशी माहिती ‘बीएसएफ’चे पोलिस महानिरीक्षक डी.के. बुरा यांनी दिली.

सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात यश आले असल्याचेही ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय सीमेनजीक ‘बीएसएफ’ला सापडलेले हे गेल्या १६ महिन्यांतील पहिले भुयार आहे. दशकभरात काश्‍मीरमध्ये ११ भुयारे आढळली असून गेल्या वर्षी कथुआ जिल्ह्यातील हिरानगर भागात दोन भुयारे उद्‍ध्वस्त करण्यात आले होते. सांबामधील हे भुयार ‘आयबी’पासून १५० मीटर आणि सीमेवरील कुंपणापासून ५० मीटर अंतरावर आहेत. चमन खुर्द या पाकिस्तान ठाण्याजवळ ते सापडले असून हे ठिकाण भारतापासून ९०० मीटर दूर आहे, असेही सांगण्यात आले.

काश्‍मीरमध्ये आढळलेली भुयारे

  • १-१६ महिन्यांत

  • २-गेल्या वर्षी

  • ११-दशकभरात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com