धक्कादायक! शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगार करताहेत सर्वाधिक आत्महत्या

वृत्तसंस्था
शनिवार, 11 जानेवारी 2020

शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांची संख्या अधिक

- आत्महत्या प्रकरणात 3.6 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली : देशात बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती अनेक सर्वेक्षणातून उघडकीस आली आहे. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याचा अनुभव आतापर्यंत अनेकांना आला असेल. या नैराश्येतून अनेकजण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. त्यातच आता शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारच सर्वाधिक आत्महत्या करत असल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कांदिवलीच्या चारकोप येथील रॉक रेव्हेन्यू अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या 40 वर्षीय डिंपल वाडिलाल यांनी बेरोजगारीला कंटाळून 3 जानेवारीला इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. बेरोजगारीला कंटाळून आत्महत्येसारखे पाऊल उचलणारी डिंपल ही एकटी नव्हती. त्यांच्यासारखेच देशातील तब्बल 12,936 बेरोजगारांनी 2018 या वर्षात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) कडून देण्यात आली आहे.

Image result for unemployment

पोलिस भरतीसंदर्भात मोठा निर्णय; आता मैदानी चाचणीनंतर लगेच...

2018 मध्ये प्रतिदोन तासांमध्ये तीन लोकांनी नोकरी मिळत नसल्याने नैराश्येतून जीवन संपविले. हा आकडा 2017 मध्ये 34 आणि 2016 मध्ये 30 हा होता. 

शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांची संख्या अधिक

देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्याने होत आहे. मात्र, त्यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे बेरोजगारांच्या आत्महत्येत आता वाढ झाली आहे.  

Image result for farmers suicide

आत्महत्या प्रकरणात 3.6 टक्क्यांनी वाढ

2018 मध्ये आत्महत्येच्या प्रकरणात 3.6 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्ये 1,34,516 प्रकरणांची नोंद झाली आहे. तर 2017 मध्ये 1,29,887 लोकांनी आत्महत्या केली होती. 2016 मध्ये 11,379 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. तर याच काळात 11,173 बेरोजगारांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unemployed Peoples Committed More Suicide Than Farmers in 2018