शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर; दिला 'हा' सल्ला

टीम ई सकाळ
Monday, 10 August 2020

काँग्रेस (Congress) नेते खा. शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी काँग्रेस पक्षाला घरचा आहेर दिला असून त्यांनी कायमस्वरुपी अध्यक्ष नेमण्याचा सल्ला दिला आहे. काँग्रेसला पूर्णवेळ नेतृत्व नसल्याने काँग्रेस दिशाहीन बनत चालली असल्याचेही शशी थरुर यांनी काल (ता. ०९) म्हटले आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेते खा. शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी काँग्रेस पक्षाला घरचा आहेर दिला असून त्यांनी कायमस्वरुपी अध्यक्ष नेमण्याचा सल्ला दिला आहे. काँग्रेसला पूर्णवेळ नेतृत्व नसल्याने काँग्रेस दिशाहीन बनत चालली असल्याचेही शशी थरुर यांनी काल (ता. ०९) म्हटले आहे. काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्याने काँग्रेस पक्षावरील लोकांचा विश्वास हा कमी कमी होत चालला असल्याने पक्षाला लवकरात लवकर पूर्णवेळ अध्यक्ष नियुक्त करण्याची आवश्यकता असल्याचे थरुर यांनी म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

माजी काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी (Rahul Gandhi) हे पक्षाची धुरा सांभाळण्यास तयार नाहीत. पण, काँग्रेसचे नेतृत्व करण्याची क्षमता राहुल गांधी यांच्यात असून त्यांनी याबाबत सकारात्मक विचार करायला हवा, असेही थरुर यांनी म्हटले आहे. पक्षाचा आपल्या नेतृत्वावर विश्वास असायला हवा. नेतृत्वाची दिशा स्पष्ट असायला हवी. गेल्या वर्षी सोनिया गांधी यांची अंतरिम अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर थरुर यांनी त्यांचे स्वागत केले होते. परंतु, पूर्णवेळ काँग्रेस नेतृत्वाची जबाबदारी सोनिया गांधी यांनी घ्यावी, अशी अपेक्षा ठेवणे आता योग्य ठरणार नाही. 

थरुर म्हणाले, 'पक्षाला लोकांच्या वाढत्या अपेक्षा आणि मीडियाद्वारे केली जाणारी तुलना यासंबधी एक विचार करुन सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावणे आवश्यक आहे. अशावेळी पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी आणि पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज आहे.  राहुल गांधी यांनी पुन्हा पक्षाचे अध्यक्षपद स्वीकार केल्या सर्वाधिक आनंद होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. राहुल गांधी यांनी आपला राजीनामा वापस घ्यायला हवा. त्यांची काँग्रेस अध्यक्षपदासाठी २०२२पर्यंत नियुक्ती करण्यात आलेली होती, असेही त्यांनी सांगितले. राहुल गांधी पुन्हा अध्यक्ष होण्यास इच्छुक नसतील तर पक्षाला आता दुसरा विचारही करण्याची गरज असल्याचे थरुर म्हणाले. हे माझं वैयक्तिक मत असल्याचेही स्पष्ट केले.

सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावण्यात काँग्रेस मोठ्या प्रमाणात अपयशी ठरत आहे. लॉकडाऊनदरम्यान, कोरोनाची परिस्थिती असो की, मग चीनच्या घुसखोरीचा मुद्दा असो राहुल गांधी यांनी वगळता कोणीही सरकारविरोधातील मुद्दे उपस्थित केले नाहीत. सरकारचे अपयश लोकांसमोर आणण्याचे काम केवळ राहुल गांधी यांनीच योग्य प्रकारे केले आहे. एक रचनात्मक पद्धतीने राहुल गांधी यांना आवाज उठवला असल्याचे शशी थरुर यांनी म्हटले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unfair on Sonia Congress must find full term chief says Shashi Tharoor