किती दुर्देवं! बाप लेकीच्या नात्याकडंही लोकं पाहतात संशयानं : हायकोर्ट

असभ्य टिप्पणी करणाऱ्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले आहे.
Father & Daughter
Father & Daughter Sakal

कोची : काही असभ्य टिप्पण्या ऐकल्याशिवाय वडील आपल्या तरुण मुलीसोबत रस्त्याने चालू शकत नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे निरीक्षण केरळ उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. एका किशोरवयीन मुलावर असभ्य टिप्पणी करणाऱ्या व्यक्तीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवले आहे. (Kerala High Court Comment On Father Daughter Relation)

Father & Daughter
धारावीचा पुर्नविकास केंद्रामुळेच रखडला; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

आरोपीने मुलीवर अश्लील शेरेबाजी केली होती त्यावर संबंधित मुलीच्या वडिलांनी आक्षेप घेतल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक असलेल्या मुलीच्या वडिलांवर आरोपीने हल्ला केल्याचेही न्यायालयाने सांगितले. आरोपीने आधी त्यांच्या मुलीवर आणि त्यांच्यावर अशोभनीय टिप्पणी केली त्याला विरोध केल्यावर संबंधित मुलीच्या वडिलांवर हेल्मेटने हल्ला करून जखमी केले.

Father & Daughter
मैं रुकेगा नहीं! तुरुंगात राहून क्रॅक केली IIT परीक्षा; वाचा काय आहे प्रकरण

या प्रकणावर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले की, 'अपमानास्पद टिप्पणी ऐकल्याशिवाय एखादी व्यक्ती आपल्या मुलीसोबत रस्त्यावरही जाऊ शकत नाही, हे अत्यंत दुर्दैवी असून, अशा गोष्टी थांबल्या पाहिजेत. तर, या प्रकरणातील आरोपीने 14 वर्षीय मुलीच्या वडिलांनी त्याच्यावर आणि त्याच्या साथीदारावर हल्ला केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, आपल्या पाल्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी ऐकल्यानंतर अशा प्रकारची प्रतिक्रिया स्वाभाविक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. जर आपण कोणावर खुनी हल्ला केला असता तर, जामीन फेटाळता आला असता असे मत आरोपीने न्यायालयात अटकपूर्व जामीन मागताना व्यक्त केले आहे.

Father & Daughter
मध्यमवर्गाचा हवाई प्रवासाकडे कल वाढणार; Airbus ने वर्तवला अंदाज

नेमकं प्रकरण काय?

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी त्यांच्या 14 वर्षांच्या मुलीसोबत रस्त्याने जात होते. त्यावेळी आरोपीने त्यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. यानंतर संबंधित मुलीच्या वडिलांनी आक्षेप घेतला असता आरोपीने मुलीच्या वडिलांवरही हल्ला केल्याचे पीडित पक्षाच्या वकिलांनी सांगितले. या प्रकरणातील दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्व वस्तुस्थिती आणि परिस्थिती पाहता आरोपींना अटकपूर्व जामीन देता येणार नसल्याचे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com