अध्यात्माचा धर्माशी संबंध जोडणे दुर्दैवी : मोदी

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 मार्च 2017

काही लोक अध्यात्माचा धर्माशी संबंध जोडतात. ते दुर्दैवी आहे. या दोन गोष्टी (अध्यात्म आणि धर्म) वेगळ्या आहेत. परमहंस योगानंद यांनी "मुक्ती'चा नव्हे तर "अंतर्यात्रा'चा मार्ग दाखविला आहे. अध्यात्म ही भारताची शक्ती आहे.
- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली - काही लोक अध्यात्माचा धर्माशी संबंध जोडतात. असा संबंध जोडणे दुर्दैवी असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. योगोदा सत्संग सोसायटीच्या शताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले, "काही लोक अध्यात्माचा धर्माशी संबंध जोडतात. ते दुर्दैवी आहे. या दोन गोष्टी (अध्यात्म आणि धर्म) वेगळ्या आहेत. परमहंस योगानंद यांनी "मुक्ती'चा नव्हे तर "अंतर्यात्रा'चा मार्ग दाखविला आहे. अध्यात्म ही भारताची शक्ती आहे. जो व्यक्ती योगा करायला सुरुवात करतो, त्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवनात योगा एक भाग बनतो.' मोदी यांनी यावेळी योगोदा सत्संग सोसायटीच्या शताब्दीनिमित्त टपाल तिकिट प्रकाशित केले.

काय आहे योगोदा सत्संस सोसायटी?
योगोदा सत्संस सोसायटी ही स्वयंसेवी संस्था आहे. परमहंस योगानंद यांनी 1917 मध्ये या संस्थेची स्थापना केली. परमहंस योगानंद यांचे "ऍटोबायोग्राफी ऑफ योगी' हे पुस्तक लोकप्रिय ठरले. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक विक्रीमध्ये या पुस्तकाला स्थान मिळाले आहे. योगादा सत्संग संस्थेला "सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप' या नावानेही ओळखले जाते. सध्या मृणालिनी माता या संस्थेच्या अध्यक्षपदी आहेत.

Web Title: Unfortunate that people link 'Adhyatma' with religion : Modi