मंदिरांवरील हल्ल्यांमुळे आंध्रत तणाव;मूर्तींच्या तोडतोफीच्या निषेधार्थ भाजपचा निषेध मोर्चा

मंदिरांवरील हल्ल्यांमुळे आंध्रत तणाव;मूर्तींच्या तोडतोफीच्या निषेधार्थ भाजपचा निषेध मोर्चा

हैदराबाद/ विजयवाडा-  आंध्र प्रदेशातील राजकारण सध्या देव-देवतांभोवती फिरत आहे. देवाच्या मूर्तीसमोर शपथ घेत वेगवेगळ्या मुद्यांवर स्वतःच्या प्रामाणिकपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न राजकीय नेते करीत होते. आता काही अज्ञात लोकांनी मंदिरांवर हल्ले करीत देवाच्‍या मूर्तींची तोडतोफ करण्याचा सपाटा लावल्याने राज्यात खळबळ उडाली असून तणावपूर्ण वातावरण आहे. 

प्रकाशम जिल्ह्यातील सिंगरिया कोंडामधील श्री वराह लक्ष्मी नृसिंह मंदिराच्या गाभाऱ्यातील लक्ष्मी नृसिंह स्वामींच्या मूर्तीवर काही अज्ञातांनी मंगळवारी दगडफेक करीत मूर्तीची तोडफोड केली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून भाविकांनी धरणे धरुन दोषींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. विजयनगर जिल्ह्यातील ‘रामतीर्थम’चे रूपांतर आता ‘रणतीर्था’त झाले आहे. तेथील एका टेकडीवर ४०० वर्षे प्राचीन राम मंदिर आहे. दहा दिवसांपूर्वी काही समाजकंटकांनी मंदिरात घुसून मूर्तीची फोडली आणि त्याचे भाग तलावाजवळ फेकून दिले. दुसऱ्या दिवशी ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरात आंदोलन सुरू झाले. भाजप न जनसेना पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांनी आज ‘चलो रामतीर्थ’चा नारा देत कूच केले होते. पोलिसांनी हा मोर्चा अडवून नेता व कार्यकर्त्यांना अटक केल्याने तणाव निर्माण झाला. याच घटनेवरून चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम आणि वायएसआर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही बाचाबाची झाली. ‘टीडीपी’च्या कार्यकर्त्यांनी वायएसआरचे खासदार साई रेड्डी यांच्‍या वाहनावर हल्लाही केला होता. त्यावरून दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडल्या होत्या. 

आतापर्यंत १५८ जणांना अटक 
रामतीर्थमसह अन्य मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांचा तपास करण्याचा आदेश सीआयडी पोलिसांना दिला असल्याचे धार्मिक मंत्री वेल्लमपल्ली श्रीनिवास यांनी आज सांगितले. आतापर्यंत आठ मंदिरांवर हल्ले झाले आहेत. ८८ गुन्हे दाखल केले असून १५८ जणांना अटक केली आहे. तिरुपती येथे सोमवारी (ता. ४) आयोजित केलेल्या पोलिस कामकाज चर्चासत्रात बोलताना मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशमधील मंदिरांवरील हल्ल्यांच्या घटनांविषयी विरोधी पक्षांना लक्ष करीत सरकारच्या कल्याणकारी योजनांविरोधात काही विरोधी पक्ष नेते मंदिरांवर हल्ले करीत आहेत, अशी टीका केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com