मार्शलचा गणवेश सैनिकाप्रमाणे असू नये : नायडू 

पीटीआय
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

- राज्यसभेतील मार्शल यांचा नवीन गणवेश एखाद्या सैनिकाप्रमाणे नसावा

नवी दिल्ली : राज्यसभेतील मार्शल यांचा नवीन गणवेश एखाद्या सैनिकाप्रमाणे नसावा, असे मत राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. या संदर्भात प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

आज सकाळी राज्यसभेचे कामकाज सुरू होताच खासदारांनी मार्शलच्या गणवेशाचा मुद्दा मांडला. यावर नायडू म्हणाले, की मार्शल यांचा गणवेश एखाद्या सैनिकांप्रमाणे दिसू नये. याबाबत नव्याने प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. संसंदेचे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहातील मार्शल नव्या पेहरावात दिसले.

पेहरावातील बदलामुळे काही माजी लष्करी अधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी टीका केली. त्यानंतर अध्यक्ष नायडू यांनी काल मार्शलचा गणवेश बदलण्याबाबत आढावा घेण्याचे आदेश दिले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uniform of marshal should not look like army says venkaiah naidu