अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच होणार सादर

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

काँग्रेस, तृणमूल काँग्रेस या पक्षांनी देखील 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्याबाबत आक्षेप घेतला होता. शिवाय तृणमूल काँग्रेसने याबाबत निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार केली होती

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने अर्थसंकल्प पुढे ढकलण्याबाबतीतील याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे आता केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच सादर होण्याचा केंद्र सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार आता 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली अर्थसंकल्प सादर करतील.

चार फेब्रुवारीपासून देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत. उत्तरप्रदेश, पंजाब यांसारख्या महत्वाच्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका असल्याने केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यास मतदार प्रभावित होतील. त्यामुळे अर्थसंकल्प पुढे ढकलण्यात यावा अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र  केंद्र सरकारने जाहीर केलेल्या तारखेलाच अर्थसंकल्प सादर होईल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

काँग्रेस, तृणमूल काँग्रेस या पक्षांनी देखील 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्याबाबत आक्षेप घेतला होता. शिवाय तृणमूल काँग्रेसने याबाबत निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार केली होती.

Web Title: Union Budget on 1st February